August 6, 2020

खुशाल जात लपवा आणि बाबासाहेब बुद्ध जात कळेल म्हणून घरात ठेऊ नका

खुशाल जात लपवा आणि बाबासाहेब बुद्ध जात कळेल म्हणून घरात ठेऊ नका

*नत्थि मे सरणं अञ्ञं, बुद्धो मे सरणं वरं ।*
*एतेन सच्चवज्जेन होतु में जयमङलम ।।*

सर्वांच्या परिचयाची ही गाथा आहे आपण बरेच वेळा ऐकली असेल, या गाथेचा अर्थ मराठी मध्ये सांगतो
समजून घ्या.

आमच्या साठी अन्य कोणतेही शरण स्थान नाही बुद्ध हेच आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ शरण स्थान आहे. याच सत्य वचनाने आमचे जय मंगल हो.

बाबासाहेबानी आपल्याल्याला एवढा चांगला बुद्धाचा मार्ग दिला आहे शरण स्थान दिले आहे आणि आपण दुसरीकडे बुवा बाबांचे शरण स्थान शोधत असतो,

घरात बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा फोटो लावू न शकणारे… *तथाकथित शिक्षित अर्धशिक्षित* उच्च शिक्षित थोडे पैश्यावाले … गावकुस सोडून फ्लॅट मध्ये राहायला गेलेले *आधुनिक* जात लपवून राहणारे *भूमिगत* सर्व देव हॉल मध्ये लावून स्वतःला हिंदू म्हणून सिद्ध करण्याचा आटा पिटा करणारे किंवा आतल्या खोलीत देवांचा बाजार लावणारे *हिंदू अस्पृश्य* अथवा लग्न कार्यात आम्ही किती बौद्ध आहेत म्हणून फक्त त्या करीता विधीला *बौध्दाचार्य किंवा भिक्खुगण* बोलविणारे आणि स्वतःला सध्या मॉर्डन समजून आम्ही बौद्ध नसून सवर्ण आहोत असे भासवन्याचा केविलवाणा प्रकार करणारे *श्री व सौ* हॉल मध्ये शो पीस म्हणून बुद्ध मूर्ती ठेवणारे सर्व तथाकथित समाज विसरणारे …. असे सर्वजन

खरंच नका लावू माझ्या बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा तुमच्या घरात .. तुमची *प्रतिष्ठा* कमी होईल

ठेवा अजून छोटी *बुद्धमूर्ती* शोकेस कपाटात

नका कळू देऊ तुम्ही बुद्धिस्ट आहात म्हणून …

पण एक लक्षात ठेवा….👍👍👍👍👍👍

ज्या बुद्धाला तुम्ही लपविण्याचा प्रयत्न करता ना…. ते बुद्ध आणि त्यांचा धम्म

चीन जपान थायलंड म्यानमार श्रीलंका भूतान नेपाळ ते अमेरिका इथे सर्व दूर जाऊन कधीच पोहोचले आहेत

तुझ्या कर्जाने आणि भाड्याने घेतलेल्या घराची त्याला काहीच आवश्यकता नाही ..

अनेक देशात करोड़ो लोक *बुद्धाला* मानतात, त्याची उपासना करतात. कितीतरी देश हे बौद्ध राष्ट्र आहेत..

तू एक काम कर, मूर्ती काढून टाक ना सरळ. तुझ्या सारख्या नकली लोकांची लायकीही नाही..

अजून एक तुझ्या 700 sqft घराला बुद्ध नको आहे ना मग लक्षात घे…

सम्राट अशोक हे पहिले चक्रवर्ती सम्राट त्यांची सत्ता अर्ध्या आशिया खंडावर होती आणि त्यांनी जगाला बुद्ध दिला…

त्यांनी 84 हजार बुद्ध स्तुपांची निर्मिती केली

एक ऐका लेणीवर 10000 लोक पिढ्यान पिढ्या काम करायचे

तुझा बंगला ह्यात कुठे बसतो बघ…

*हे सरकारी अधिकाऱ्या*

नको ठेऊ बाबासाहेब आंबेडकर तुझ्या घरात कदाचित तुझी पोरं बिघडतील…

पण एक लक्षात ठेव ज्या इंग्लिश मिडीयम ला पोरं घालतोस ना… आणि ज्या देशातून हे इंग्लिश आले त्या देशाने, आमच्या बाबासाहेबांना जगातील नंबर एक चा विद्वान आणि *सिम्बॉल ऑफ नॉलेज* म्हणून घोषित केलंय. तू कोण रे दळभद्रया…

भूमिगत लपव्या, जय भीम म्हणायलाही लाजणाऱ्या फालतु माणसा..

जरा गूगल सर्च कर…

जगातील सर्व देशात माझ्या बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा पुतळा आहे ..

जगातली सर्वात जास्त चौक बाबासाहेब आंबेडकर नावाने बद्ध आहेत…

तुझ्या आरक्षित सरकारी नोकरीने घेतलेल्या घरात बुद्ध आणि बाबासाहेब यांना नको देऊस स्थान

…..

हेच 2 विश्वाचे सारथी गेले जगात घरा घरात ….

तुझ्या घराची गरज नाय…

तू बस लपवत तुझी ओळख आणि कर खुश तुला … त्यांच्या खासगीत तुजी जात काढणाऱ्या लोंकात….

*भवतु सब्ब मङ्गलं*

*नमोबुध्दाय🙏जयभीम*

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *