August 6, 2020

अहमदनगरमध्ये सलग दोन अट्रोसिटी..! आरोपी अजून मोकाट.!

अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यात सलग एका पाठोपाठ दोन अट्रोसिटी च्या घटना समोर आल्या आहेत आणि त्यामुळे एकाच खळबल उडाली आहे आणि तसेही संपूर्ण महाराष्ट्रातून अट्रोसिटी च्या केसेसे ह्या सर्वात जास्त नगर जिल्ह्यातूनच घडतात आणि सर्वात जास्त केसेस ज्या आहेत त्या नगर मधूनच दाखल होतात आणि अनेक केसेस तर भीती पोटी दाखल हि होत नाहीत.

नगर मध्ये दोन घटना घडले आहेत ज्याची केस दाखल करण्यात आली आहे परंतु अजून हि अट्रोसिटी दाखल होवून देखील सर्व आरोपी हे बाहेर फिरत आहेत आणि त्यांना अजून हि अटक करण्यात आली नाही.

प्रकरण 1:

अगडगाव ता. नगर येथे इथे दि १९/०६/२०२० रोजी गोरक्ष दादाबा भिंगारदिवे, जात-बौद्ध, वय ५० वर्ष, यांच्या कुटुंबियांना घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. फिर्यादीचा व आरोपीचा मधील जागेच्या हद्दीखुना वरून वाद होता व मा.न्यायालयात तो
भिंगारदिवे यांच्या बाजूने लागला होता, त्या गोष्टींचा राग धरून आरोपीने जातीवचक शिव्या देत मारहाण केली. सदरील आरोपी हे हिंदू धर्मातील सवर्ण आहेत.१)एकनाथ भाऊसाहेब घोगरे २) देवराम एकनाथ घोगरे, ३)बाळू एकनाथ घोगरे ४) बाळू चा मुलगा यांच्यावर अट्रोसिटी अंतर्गत कलम ३/१/r, ३/१/s, ३/२ VA, ३२३, ५०४ व ५०६ अनुसार भिंगार ता. नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदविण्यात आहे आहेत.
अट्रोसिटी मधील आरोपीनां अजून अटक केली नसून फिर्यादी भिंगारदिवे यांना ताब्यात घेतले आहे.

प्रकरण 2:

दि. २९/०६/२०२० रोजी मारुती बाबुराव पाटोळे ,जात बौद्ध, यांच्या आई वडिलांना काही दिवसांपूर्वी शेत जमीन खुरपणीचे कोळपे दिले होते ते परत मागण्यासाठी गेले असता त्याच्यात किरकोळ वाद निर्माण झाला होता. देवाण घेवाणीच्या किरकोळ वादातून धारदार हत्याराने रक्तबंबाळ होईपर्यंत पाटोळे यांच्या आई वडिलांना
मारहाण करण्यात आली.
या घटनेतील आरोपीसुद्धा हिंदू धर्मातील सवर्ण आहेत. १) अविनाश भाऊसाहेब मोरे २) संभाजी भाऊसाहेब मोरे ३) उज्वला संतोष खेडकर ४)गउबाई माईसाहेब मोरे यांच्यावर भा. द. वि. ३२४, ५०४, ५०६, ३४ सह अट्रोसिटी अंतर्गत ३/१/r, ३/१/s, व ३/२ V A , इ गुन्हे MIDC पोलीस स्टेशन अहमदनगर मध्ये नोंद झाले आहेत. परंतु अद्याप आरोपीना अटक करण्यात आले नाहीत. आरोपी मोकाट फिरत आहेत.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *