August 6, 2020

सरकारी अधिकार्याने मुद्दाम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ऑफिसातून काढला त्यानंतर भिमसैनिकानी जे केले ते पाहून तुम्हाला हि गर्व वाटेल

मुख्य पोस्ट कार्यालयात विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे अनावरण.

मागील 3 दिवसांपासून औरंगाबाद औरंगाबाद येथील मुख्य पोस्ट ऑफिस,जुना बाजार येथे मुख्य पोस्ट अधीक्षक बी के राहुल ह्यांनी खोडसाळपणे शासन निर्णयाचा हवाला देत विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा कार्यालयातून काढून टाकल्या होत्या परवा बि के राहुल याची नागपूर येथे बदली झाली असतांना एक महिला पोस्ट कर्मचारी यांनी सदरील प्रकार सोशल मीडिया च्या माध्यमातून समोर आणला व समाज माध्यमावर या बाबत संताप व्यक्त होत होता.
प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी,बी के राहुल याला जाब विचारण्यासाठी भीमसैनिक पोस्ट कार्यालयात धडकले असता बि के राहुल ह्यांनी नागपूरला पलायन केले असल्याचे कळाले.
काल सायंकाळी नव्याने रुजू होणारे प्रभारी मुख्य पोस्ट अधिकारी यांचेशी चर्चा करून सहाय्यक पोस्ट अधीक्षक शेख असदुल्लाह,श्री.ताठे यांनी आज सकाळी हा वाद थांबण्यासाठी प्रतिमेचे अनावरण करण्याचा निर्णय घेतला व त्याची कल्पना आम्हाला दिली असता आम्ही त्यास सहमती दर्शवली व कार्यालयीन स्थरावर प्रतिमेचे अनावरण करावे असे कळविले परंतु सहायक पोस्ट अधीक्षक श्री.शेख असदुल्लाह याच्याशी झालेल्या चर्चे नंतर पोलीस निरीक्षक(सिटीचौक) श्री.संभाजी पवार सूचनेवरून आज सकाळी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या व भीमसैनिकांच्या उपस्थितीत.
सिटीचौक पोलीस ठाणे कर्मचारी श्री.बोर्डे,श्री.मोदी व विशेष शाखा (पोलीस आयुक्त कार्यालय)पोलीस कर्मचारी श्री.महाडिक,श्री.मोरे यांच्या उपस्थितीत विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.
महापुरुषांच्या प्रतिमा हटवून अवमान करणाऱ्या पोस्ट अधीक्षक बि के राहुल यांच्या वर करवाई व्हावी या करिता पोलीस प्रशासनासोबत चर्चा करण्यात आली.

पोलीस प्रशासनाने व पोस्ट अधिकारी कर्मचारी यांनी तत्परता दाखवत कार्यालयीन प्रोटोकॉल नुसार प्रतिमेचे अनावरण केले या करिता सर्वांचे आभार.
समाज माध्यमावर ह्या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या सर्व भीमसैनिकांच्या प्रयत्नामुळे आपल्या भावना पोस्ट विभाग व पोलीस प्रशासनापर्यंत पोहचल्या व अखेर प्रतिमांचे आज अनावरण करण्यात आले

सदरील लेख हा शुभम दिवे यांच्या वाल वरून घेतला आहे

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *