August 6, 2020

माता रमाई यांच्या बाबत टिकटोक व्हिडियो बनवून जातीय तेड निर्माण करणारा आरोपी जेरबंद

आकोला | सध्या लॉकदावून मुळे सर्व आंबेडकरी जनतेने माता रमाई यांची जयंती घरी बसूनच साजरी केली आणि तसेच सर्वांनी माता रमाई यांना अभिवादन देखील घरीच राहून केले परंतु याच सोबत एक सामाजिक तेड निर्माण करणार व्हिडियो समोर आला या मध्ये माता रमाई यांच्या गाण्यावर एका तरुणाने एका उंदराला फाशी लावली होती त्याध्ये माता रमाई यांचे “तुझ्या विना रमा मजला सुने सुने सारे जग वाटे, हे गाणे वापरण्यात आले होते आणि त्यामुळे आंबेडकरी समुदाया मध्ये एक असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्यामुळेच काल त्या आरोपी विरोधात तक्रार दाखल केली होती.

हा व्हिडियो अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील बेलताळा या गावातील आरोपी शुभम चव्हाण याने हा हेतूपरस्पर व्हिडियो बनवला होता आणि दोन सामाजिक तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता 295 A व 66 (f) व अनुसूचित जाती जमातीअत्याचार प्रतिबंधात्मक कायदा (अट्रोसिटी ऍक्ट ) अनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.ही कार्यवाही अतिशय शीघ्र व तात्काळ करण्यासाठी पातूर तालुक्यातील बौद्ध अनुयायांनी विनंती केली व त्याच अनुषंगाने पातूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार गुल्हाने साहेब व त्यांच्या टीम नि कार्यवाही केली व आरोपीला जेरबंद केले

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *