July 5, 2020

आम्हीच रडवणार आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना

आज आपण बातम्या सोडून जरा बाजूला जाणार आहोत आज आपण अश्या एका मुद्याला हात घालत आहोत to खरच आज काळाची गरज बनला आहे कारण आपणच आपल्या बाबासाहेबांना रडवत आहोत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलं होत शिक्षण हे वाघीनेचे दुध आहे जर तुम्ही प्याले तर तुम्ही गुरगुरल्या शिवाय राहणार नाही त्यामुळे बाबासाहेब म्हणाले होते सार्वजन शिका त्यांमुळे आणि आपण काय केल त्यांनी तालावर सोडा आणि हातात पाटी पुस्तक आणि पेन घ्या सांगितलं तर आपण काय केल आपण ते घेन्याएवजि हातात दंडुके उचलले आणि त्याच सोबत दगड हि. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवन भर काय केले तर सर्वधर्म समभाव या करिता काम केले आणि अनेक समाजांना एक करण्याचे काम केले पण आपण काय केले तर आपण त्यांच्या कार्याच्या बदल्यात त्यांना एका समाजात वाटून घेतले.

बाबासाहेब एक मेव अस व्यक्ती महत्व आहे जगातील दोन नंबरचा सर्वात मोठा देश आहे जो त्यांच्या पेनाच्या शाहीतून उतरलेल्या शब्दा विना चालू शकत नाही इतक पावरफुल व्यक्तिम हत्व त्याचं होत पण आम्ही काय केलं त्यांना एका समाजाच्या पदराशी बांधल आणि बस त्यांची दोरी हि त्याच समाजा सोबत ठेवली ? आणि हो तुम्ही आम्ही करणार तरी काय ? हो कि नाही कारण बाबासाहेब आंबेडकर म्ह्नातल कि दुनिया जग भिते तर मग आम्ही फक्त त्याचं नाव घेणार आणि आज पर्यंत फक्त बाबासाहेब यांचा ढाल म्हणून वापर केला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो तुमच्या आमच्या घरात आहेत आणि असायला हि हवे कारण त्यांच्या विना आपल्या साठी दुसर कोणी नाही पण मग मला सांगा अजून किती दिवस त्यांचे फक्त फोटो घेवून फिरणार आहोत कारण त्यांच्या फोटोला पाकीट किंव्हा घरात ठेवण्या पेक्ष्या तुम्ही त्यांना आपल्या विचारात सामावून घ्याना मग कस जरा बर वाटेल. नुसते फोटो लावून आणि पन्नास वेळा जय भीम, जय भीम म्हणून आपल्यातला बाबासाहेब पेटणार नाही. त्यासाठी डोक्याला पुस्तकांच पाणी पाजलं पाहिजे, लेकरांना शाळा दाखवली पाहिजे. डोक्यातली धर्म आणि जातीची बुरशी झटकली पाहिजे. निळा टीका लावून फुसका अभिमान बाळगण्यापेक्षा बाबासाहेबांसारख्या शिक्षणाच्या डिग्र्या घेऊन कडक स्वाभिमानात जगणं कधीबी भारी.

आणि एक नक्की लक्ष्यात असूद्यात जो पर्यंत निळ्या रंगा साठी किंव्हा निळ्या झेंड्या ऐवजी तुम्ही आम्ही आणि आमची लेकर निळ्या शाही करता जाळणार नाहीत किंव्हा पेटून उठणार नाहीत तो पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ढसाढसा रडणार आहेत .नितीन थोरात यांच्या पोस्ट पासून सारांश घेऊन लिहिलेली पोस्ट 

 

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *