July 5, 2020

इंदुमिल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतुळा मेड इन इंडियाच हवा, रामदास आठवलेंचा मेड इन चायनाला विरोध

दोन दिवसान अगोदर चायना कडून भारतीय सैन्या वर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण देशातून मागणी होत आहे देशात सर्व चायनीज वस्तूंवर बंदी घालावी आणि त्याच सोबत भारतीयांनी चायनीज वस्तूंचा बहिष्कार करावा त्या करिता सर्वच स्तरावरून तसे प्रयत्न देखील होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता रिपब्लिकन पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हि एक मागणी केली आहे.

गेल्या सोमवारी रामदास आठवले यांनी इंदुमील येथे बसवण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीच्या कामा बाबतची आढावा बैठक घेतली त्या मध्ये काम कस चालू आहे त्याच सोबत सर्व काही माहिती ते घेत होते. इंदुमील इथे जे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे ते पूर्णता अंतरराष्ट्रीय दर्जाचे असणार आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी व्हिडियो कॉन्फरन्स द्वारे या कामाचा अथवा घेतला आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा चौथरा जो चायनात बनणार होता आणि ज्या कंपनीला हे काम दिले होते होते ते रद्द करायचे सांगून आता हा चौथरा भारतातच बनवा आणि आता इंदूमिल इथे बनणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे पूर्णता मेड इन इंडिया असावे अशी मागणी वजा सूचना देखील रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसर्वा तसेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री राम्दास्व आठवले यांनी सांगितले आहे.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *