July 5, 2020

भाऊ झोपेत सुद्धा फेसबूकवर होता तेवढ्यात अचानक बाबासाहेब त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले

भाऊ झोपेत सुद्धा फेसबूकवर होता तेवढ्यात अचानक बाबासाहेब त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले

” दिवसभर फेसबुकवर काय सुरू असते रे तुझे ?

“भाऊ अभिमानाने म्हणाला,’ बाबासाहेब मी तुमचे वेगवेगळे फोटो टाकून कोणत्या फोटोला किती लाईक मिळतात ते बघत असतो.

‘बाबासाहेबांनी ते फोटो आणि खाली लिहिलेले भाऊचे वाक्य वाचणे सुरू केले…-
बघू या माझ्या बाबासाहेबांना किती लाईक मिळतात ?-
बघू या बाबासाहेबांच्यारक्ताचे कितीजण आहेत ?-
बघू या किती जण जयभीम म्हणतात ?
ते वाक्य वाचताच भाऊच्या कानाखाली जोरदार थापङ देत बाबासाहेब कडाडले…..

” मला लाईक मिळवून देणारा तु रे कोण ?अन असे विचार असणारा तु स्वतः तरी माझ्या रक्ताचा शोभतो का ?

तुला फोटो टाकायची एवढी हौस आहे तर माझे फोटो टाकण्याऐवजी, माझ्या ग्रंथातील वेगवेगळ्या लेखांचे फोटो टाकण्याचे का नाही सुचत तुला ?

बाबासाहेबांच्यारागाचा पारा पाहून भाऊ गर्भगळीत झाला त्याची ती अवस्था पाहून बाबासाहेब त्याला प्रेमाने समजावत म्हणाले,” अरे यापेक्षा व्यवस्था परिवर्तनासाठी लिखाण कर नसेल काही सुचत तर माझे विचार लोकांना सांगभलेही मिडिया तुझा नसल्याने तिथे तुझे विचार छापल्या जाणार नाहीत पण तुला बिना कष्टाचे असे हे फेसबुकचे माध्यम मिळाले तर त्याचा तरी योग्य ऊपयोग करून घे.मला तुम्हा सुशिक्षित लोकांकडून विशेषतः तरूणांकडून फार अपेक्षा आहेत रे. यासाठी मी माझ्या जीवाचे रान केले होते का ?

मला माझे फोटो किंवा पुतळ्यांची संख्या वाढवणार्यांची नाही तर माझ्या बहुजन समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना शोधणार्या, जातीविहीन समाजरचनेसाठी झटणार्या, व माझे राहिलेले कार्य पूर्णत्वास नेऊन माझे स्वप्न साकारण्यासाठी धडपडणार्या लोकांची गरज आहे. असले रिकामटेकडेपणा करणार्यांची नाही.
बाबासाहेबांचे घणाघाती शब्द ऐकून भाऊ धडपडून जागा झाला आणि चूक समजल्याने त्यानेओशाळून आपली मान खाली घातली.
{ हा लेख पुर्णपणे काल्पनिक आहे या लेखावरूनएखादा जरी झोपेतून जागा झाला तरी खुप आहे.}

loading...

One thought on “भाऊ झोपेत सुद्धा फेसबूकवर होता तेवढ्यात अचानक बाबासाहेब त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले

  1. Ekdam mast babasahebancha jay jay karnyapdkshya roj ek suvichar post kel tari far
    Like la mahatwa nahi
    Babasahebana sar jag olakhat…
    Jai bhim

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *