August 6, 2020

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २०-२१ वर्षाच्या धार्मिक अभ्यासाअंती हिंदु देव-देवतांशी तोडलेली नाळ बौध्दधम्माशी जोडण्याचा प्रयत्न म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्योध्दराचा अंतिम उद्देशच नामशेष करणे होय.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २०-२१ वर्षाच्या धार्मिक अभ्यासाअंती हिंदु देव-देवतांशी तोडलेली नाळ बौध्दधम्माशी जोडण्याचा प्रयत्न म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्योध्दराचा अंतिम उद्देशच नामशेष करणे होय.

गेले चारपाच दिवस आषाढी पौर्णिमा या शब्दाच्याप्रयोगा ऐवजी आषाढी एकादशी या शब्दाचा प्रयोग केलेली पोस्ट निरनिराळ्या व्हाटस ग्रुपवर फिरत आहे. त्यासाठी पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ति ही बुध्दाची मूर्ति आहे असे बाबासाहेबांनी म्हटले आहे त्याचे उदाहरण दिले जात आहे.बाबासाहेबांनी हे म्हटले आहे हे जरी खरे असले तरी जेव्हां त्यांच्या पत्निने म्हणजे रमाईने पंढरपूरला जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांनी नकार दर्शविला. का ते जाणून घेतले आहे का?
हे सर्वश्रुत आहे की भारतातील जे काही हिंदू देवळे आहेत ती सर्व बौध्द विहारे होते. हिंदुह्रदयसम्राट बाळ ठाकरे यांचे पिताश्री प्रबोधनकार ठाकरे यांनी ”देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे” ह्या पुस्तकाद्वारे हेच सिध्द करून दाखविले आहे. त्यामुळे विठ्ठलाची मूर्ति बुध्दाची आहे हा जो कोणी सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे ते त्यांनी जणू मोठे संशोधन केले आहे अशातला भाग नाही.खरे म्हणजे जो कोणी प्रयत्न हा केला आहे त्यामागे कुटिल डाव आहे.हे हिंदुत्वाचे डोके आहे. त्यामागे आमच्यातलेच दीडशहाणे हा ला हा ला मिळविणारे आहेत.कारण एकतर त्याना प्रसिध्दीलोलुप म्हणजेच मंत्री-संत्री व्हायची,पुढारी, नेता बनण्याची हाव असावी नाहीतर बाबासाहेबांच्या मानवउध्दारक चळवळीचे मर्म तरी कळले नसावे. बालपण आणि तारुण्य यातील मधल्या अवस्थेतील तुमच्यापेक्षा मला जास्त कळतय अशी जी वृत्ती असते तशीच वृत्ती चळवळीत नुकतेच पदार्पण केलेली व्यक्तीची असते मग ती कोणत्याही वयाची असो.
ज्याअर्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २०-२१ वर्षाच्या धार्मिक अभ्यास केला त्यांना ह्या हिंदुच्या कारवाया माहित नसाव्या काय? तरीही बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञा दिल्या आहेत तिथेच संपले सारे. काय गरज हिंदुसणांची,हिंदु देव-देवतांची नाळ बौध्द धम्माशी जोडण्याची. प्रथम अस्सल बौध्द बनण्याचा प्रयत्न करा.महार जातीचे गोडवे गाण्याचे बंद करा.बाबासाहेबांचे हितचिंतक जरी अनेक असले तरी त्यांनी बुध्द,फुले व कबीर यांनाच गुरु मानले आहेन हे प्रथम जाणून घ्या. आम्हाला जे अभ्युदयाचे,उत्कर्षाचे,विकासाचे,प्रगतीचे दिवस आणि सन्मानाचे,आदराचे,प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे ते केवळ बाबासाहेबांच्यामुळेच असे जेव्हा तुमच्या मुखातून ठामपणे शब्द प्रगट होतील तसेच बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड करणे म्हणजे त्यांच्या सिध्दांताप्रमाणे आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे मार्गक्रमण करणे हे जेव्हा पूर्णपणे तुमच्यामनावर बिंबेल त्याचवेळी बाबासाहेबांचे निष्टावान सच्चे अनुयायी बनण्यास पात्र ठराल. अशी पात्र न ठरलेली व्यक्ति हिंदुसणांची,हिंदु देव-देवतांची नाळ बौध्द धम्माशी जोडतच राहणार.
एक गोष्ट विशेष ध्यानात घ्या की,बाबासाहेबांनी कोणालाही धर्मांतराची जबरदस्ती केलेली नाही. धर्मांतरापूर्वीच बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाला आवाहन केले होते की, ” मी सांगतो म्हणून धर्मांतर केले पाहिजे, या भावनेला वश होऊन काही करू नका. तुनच्या बुध्दीला जर पटेल तर त्याला होकार द्या. ” असे असतांना दोन दगडीवर का पाय ठेवता? ज्यांना हिंदुधर्माच्या नरकात लोळत रहावयाचे असेल त्यांनी जरूर त्या नरकात लोळत रहा. नका करू पांचटपणा बौध्द धम्म ज्यांनी मनापासून स्वीकारला आहे त्यांच्यात लुडबूड करण्याचा. तुम्ही शुध्द हिंदू रहा. आम्हांला शुध्द बौध्द राहू द्या. त्यामध्ये कालवाकालव करण्याचा प्रयत्न करू नका.

लेखक:- एच.बी.जाधव,केंद्रीय सेक्रेटरी (आर.पी,आय-कांबळे)

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *