July 5, 2020

मैने प्यार किया चित्रपटातील हिरोईन भाग्यश्री पटवर्धन माधवराव पटवर्धन आणि राजर्षी शाहू महाराज व आरक्षण

आपल्या समाजातील ज्या लोकांना विशेषतः जास्त शिकलेल्या लोकांना ज्यांना आरक्षण म्हणजे भिख वाटते, आरक्षण म्हणजे लाचारी वाटते, आरक्षण म्हणजे कुबड्या वाटतात त्यांच्या साठी हा लेखन प्रपंच आपल्या मूलनिवासी बहुजन समाजातील लोकांना अर्थात SC / ST OBC/ -कुणबी-मराठा मधील बहुतांश शिकल्या – सवरलेल्या लोकांना विशेषतः जास्त शिकलेल्या लोकांना आरक्षण म्हणजे कुबड्या वाटतात , आरक्षण म्हणजे भीक वाटते , आरक्षण म्हणजे लाचारी वाटते .

परंतु आपल्या मूलनिवासी बहुजन समाजातील महापुरुषांनी फार मोठा संघर्ष करुन हे आरक्षण अर्थात प्रतिनिधित्व मिळविले आहे . ते सहजा सहजी मिळालेले नाही . त्यासाठी फुले – शाहू – पेरियार – आंबेडकर यांना १८४८ ते १९५६ म्हणजे १०८ वर्षांचा संघर्ष करावा लागला .

आपल्याला मात्र हे आरक्षण फुकटात मिळाल्यामुळे त्यांची किंमत किंवा त्याचे महत्व वाटत नाही . जसे हवा म्हणून हवेची किंमत वाटत नाही . किंवा सूर्यप्रकाश फुकटात मिळतो म्हणून सूर्यप्रकाशाचे महत्व वाटत नाही .

आपल्या महापुरुषांचा इतिहास हा आरक्षण समर्थकांचा इतिहास आहे . आणि युरेशियन ब्राह्मणांचा इतिहास हा आरक्षण विरोधकांचा इतिहास आहे . याचा अर्थ हा आरक्षणाच्या नायकाचा आणि खलनायकाचा इतिहास आहे .

म्हणून आपले शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजून घेतले पाहिजे , ओळखले पाहिजे .

Idea_of_Reservation अर्थात , आरक्षणाची कल्पना ही राष्ट्रपिता जोतिराव फुलेंची . ही कल्पना त्यांनी प्रथम १८६९ ला आणि नंतर १८८२ ला इंग्रज सरकारपुढे मांडली .

Implimentation_of_Reservation अर्थात , आरक्षणाची अंमलबजावणी भारतात आधुनिक काळात सर्वात प्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या करवीर अर्थात कोल्हापूर संस्थानात दि .२६ जुलै , १९०२ पासून केली .

Policy_of_Reservation अर्थात , आरक्षणाची नीती किंवा धोरण विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून २६ जानेवारी , १९५० पासून निश्चित केले .

राष्ट्रपिता जोतिराव फुलेंच्या आरक्षण या कल्पनेला लागू करण्याचे काम त्यांचे पट्टशिष्य राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केले .

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दि .२६ जुलै , १९०२ रोजी सर्व ब्राह्मणेतरांसाठी ५० टक्के आरक्षणाची घोषणा आपल्या करवीर संस्थानात अर्थात कोल्हापूर संस्थानात केली .

६६४ संस्थानापैकी मूलनिवासी बहुजन समाजासोबत सामाजिक न्याय करणारी तीनच संस्थाने

१) करवीर अर्थात कोल्हापूर
२) बडोदा आणि
३)इंदौर …

दोन मराठा कुणबी व एक धनगर .

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जे ५० टक्के आरक्षण घोषित केले त्यातून केवळ चारच ( ४ ) जाती वगळल्या

( १ ) ब्राह्मण , ( २ ) शेणवी , ( ३ ) प्रभू ( ४ ) पारशी .

या चार पुढारलेल्या जाती सोडून ( वगळून ) बाकी सर्व जातींना अर्थात , ब्राह्मणेत्तरांना अर्थात मूलनिवासी बहुजन समाजाला आरक्षण अर्थात प्रतिनिधित्व घोषित केले याला म्हणतात Implimentation of Reserva tion अर्थात , आरक्षणाची अंमलबजावणी .

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण का दिले ? महाराजांनी अगोदर पाहणी केली आणि पाहणीत त्यांच्या लक्षात आले की , सरकारी दरबारी ७१ पैकी ६० युरेशियन ब्राह्मण उच्च पदाच्या नोकऱ्यांमध्ये होते . व ११ ब्राह्मणेत्तर होते . तसेच खाजगीत ५२ पैकी 45 युरेशियन ब्राह्मण नोकरीत होते व ७ ब्राह्मणेत्तर होते .

हा प्रशासनातील असमतोल दूर करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व ब्राह्मणेतरांसाठी ५० टक्के आरक्षणाची घोषणा केली . त्यापूर्वी सर्व मोक्याच्या व माऱ्याच्या जागी माधव , बर्वे या चित्पावन ब्राह्मणानी आपल्याच जातीतील लोकांना नोकऱ्या दिल्या होत्या .

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या या क्रांतिकारी निर्णयाला ब्राह्मणांनी विरोध सुरू केला खरे तर शाहू महाराज स्वतः राजे होते स्वतःच्या संस्थानात आरक्षण देणार होते . कोणाच्या घरातून किंवा खिशातून किंवा कोणत्याही ब्राह्मणांच्या संस्थानातून देणार नव्हते . तरी ब्राह्मणांनी ब्राह्मणेत्तरांच्या आरक्षणाला विरोध केला होता . त्यातील एका ब्राह्मणाने तर कळसच केला ,

त्याचे नाव अॅड . गणपतराव अभ्यंकर .

हा सांगलीच्या पटवर्धन संस्थानामध्ये नोकरीस होता . हा पटवर्धन कोण ? भाग्यश्रीचा आजोबा . ही भाग्यश्री कोण ? ” मैने प्यार किया ” या हिंदी सिनेमातील सलमान खानची नायिका .

जसाही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व ब्राह्मणेत्तरांसाठी ५० टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीचा कायदा केला . तेव्हा सांगली संस्थानातील पटवर्धन संस्थानिकाचा एक मुनिम अॅड.गणपतराव अभ्यंकर सांगलीवरुन कोल्हापूरला आला व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेऊन

१) जातवार स्कॉलरशिप
२) जातवार नोकऱ्या देण्याच्या निर्णयाला विरोध केला .

त्यांच्या मते , लायकी पाहूनच स्कॉलरशिप व नोकऱ्या द्यायला पाहिजेत . खरे तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व ब्राह्मणेत्तरांसाठी जे ५० टक्के आरक्षण घोषित केले . ते स्वत : च्या अर्थात करवीर अर्थात , कोल्हापूर संस्थानातून , याचे सांगलीच्या पटवर्धन संस्थानातील अॅड . गणपतराव अभ्यंकराला वाईट वाटत होते .

का वाईट वाटत होते ?
कारण त्यामुळे कोल्हापूर संस्थानातील युरेशियन ब्राह्मणांना नोकऱ्या मिळणार नव्हत्या , त्यांचे नुकसान होणार होते . ते होऊ नये म्हणून सांगली संस्थानातील हा ब्राह्मण कोल्हापूरला गेला व छत्रपती शाहू महाराजांना असे आरक्षण देऊ नये असा सल्ला दिला .

याला म्हणतात जातीय हित व जातीय चेतना , किंवा जातीय एकी , आजसुद्धा सर्व पक्षातील ब्राह्मणांमध्ये अशीच एकी आहे . ते सर्व पक्षात असून एक असतात आणि आपण एका पक्षात असून अनेक असतो . त्यामुळे त्यांच्यात असते एकी व आपल्यात असते बेकी .

आरक्षणाच्या मुद्यावर आजही युरेशियन ब्राह्मण कडाडून विरोध करतात . मग तो भाजपचा ब्राह्मण असो , काँग्रेसचा ब्राह्मण असो , सेनेचा ब्राह्मण असो , कम्युनिस्टांचा ब्राह्मण असो किंवा कोणत्याही पक्षाचा ब्राह्मण असो . सर्वांचा आरक्षणाला विरोध आहे .

काय आरक्षण कुबड्या आहेत ? काय आरक्षण भीक आहे ? काय आरक्षण लाचारी आहे ? जर असे असते तर , युरेशियन ब्राह्मणांनी आरक्षणाला विरोध केला असता ? यावर शिकलेल्या लोकांनी विशेषतः आरक्षणाच्या लाभार्थी लोकांनी गंभीरपणे विचार करायला हवा .

तर, अँड.गणपतराव अभ्यंकरांनी आरक्षणाला विरोध केला . राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कर्ते सुधारक होते , बोलके सुधारक नव्हते . शिवाय ते फॉरेन रिटर्न होते .ॲड.गणपत अभ्यंकरांचा बामणीकावा त्यांच्या लक्षात आला .

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना घोड्याच्या पागेत ( तबेल्यात ) नेले त्या घोड्यांच्या तबेल्यात खूप घोडी होती . सर्व घोडी आरामाने आपल्या स्वतःच्या तोबऱ्यातील चंदी ( हरघरे / चणे ) खात होती .

राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि अॅड . गणपत अभ्यंकर हे सर्व पहात होते . तेवढ्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी तेथील मोतदारांना घोड्यांच्या तोंडाचे तोबरे सोडून त्यातील चणे / हरभरे खाली सतरंजीवर टाकायला सांगितले नंतर सर्व घोडी मोकळी सोडायला सांगितले . हे सर्व प्रात्यक्षिक अॅड.गणपत अभ्यंकर निमूटपणे पहात होते .

जसेही मोतदारांनी घोड्यांना मोकळे सोडून दिले . तेंव्हा जी तगडी घोडी होती , शक्तिशाली घोडी होती , बलशाली घोडी होतो , धडधाकट घोडी होती , निरोगी घोडी होती , मोठी घोडी होती , ताकदवान घोड़ी होती , शक्तिमान घोडी होती, ती सर्व घोडी सतरंजीवरील त्या हरभ-यावर ,चण्यावर तुटून पडली

आणि जी कमजोर घोडी होती , आजारी घोडी होती … लांबच उभी होती व दुरुनच पहात होती .. काय पहात होती ? ही ताकदवान घोडी , तगडी घोडी , शक्तिशाली घोडी , मोठी घोडी , मस्तवाल घोडी खाताना सुद्धा व्यवस्थित खात नव्हती . मग कशी खात होती ?

ती तोंडाने हरभरे खायची व मागच्या पायाने लाथा झाडायची, जेणेकरुन दुसऱ्या घोड्याने यात घुसू नये , त्यामुळे कमजोर घोड्यांनी विचार केला , कोणता विचार केला ? हरभरे खाण्यासाठी त्या तगड्या घोड्याच्या गर्दीत न घुसण्याचा विचार केला , असा विचार बिचाऱ्या अशक्त घोड्यांनी का केला ? कारण त्या मस्तवाल घोड्यांच्या गर्दीत घुसलो तर , हरभऱ्याऐवजी लाथाच मिळतील . मग कशाला गर्दीत घुसायचे ? असा विचार करुन बिचारी गरीब घोडी , अशक्त घोड़ी , कमजोर घोडी , लांबूनच ते दृष्य पहात होती .

तेंव्हा राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्या कमजोर घोड्याकडे बोट दाखवून अँड . गणपत अभ्यंकराला म्हणाले , “अभ्यंकर , या कमजोर घोड्यांचे काय करु ? त्यांना गोळ्या घालू ?

असे होणार हे मला अगोदरच माहीत होते . म्हणून मी प्रत्येकाचा वाटा प्रत्येकाच्या तोंडाला बांधला होता . जेणे करुन दुसरे कोणी त्यात तोंड घालणार नाही . ” याला म्हणतात आरक्षण ,

यावर अॅड . गणपत अभ्यंकराने मान खाली घातली . त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले . त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज अभ्यंकरांना म्हणाले , ” अभ्यंकर , जाती माणसात नसतात , जनावरात असतात . परंतु तुम्ही जनावरांची व्यवस्था माणसाला लागू केली आणि मी माणसाची व्यवस्था जनावरांना लागू केली . ”

यावर अभ्यंकर काय बोलणार ? चूप बसले . चिडीचूप झाले .

आणि म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे आद्यजनक आहेत . आरक्षणाचे नायक आहेत . आधुनिक भारतात संपूर्ण भारतात ब्राह्मणेतरांसाठी ५० टक्के आरक्षण देणारा एकमेव राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होय .

राष्ट्रपिता जोतिराव फुलेंच्या Idea of Reservation ला अर्थात आरक्षण या संकल्पनेला आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या Implimentation of Reservation ला महामानव बाबासाहेब डॉ.भिमराव आंबेडकरांनी -भारतीय संविधानाद्वारे कायदेशीर रुप दिले . संस्थानातील आरक्षण संविधानात आणले . संपूर्ण देशात लागू केले .

कलम ३४० नुसार मराठा – कुणबी – ओबीसींना ५२ टक्के आरक्षण , कलम ३४१ नुसार – अस्पृश्यांना अर्थात एससींना १५ टक्के आरक्षण, कलम ३४२ नुसार आदिवासी अर्थात , एसटींना ७.५ टक्के आरक्षण .

यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची व्यवस्था केली, आणि १०८ वर्षे सतत संघर्ष करुन मिळविलेले आरक्षण आज काँग्रेसचे ब्राह्मण , बीजेपीचे ब्राह्मण , कम्युनिस्टाचे प्राह्मण , सेनेचे ब्राह्मण , थोडक्यात सर्वच पक्षातील ब्राह्मण एल.पी.जी. अर्थात , उदारीकरण , खाजगीकरण व जागतिकीकरणाच्या माध्यमातून नष्ट करीत आहेत .

एल.पी.जी. च्या माध्यमातून संविधानाला हात न लावताच संविधान नष्ट करण्याचे षड्यंत्र सुरु केले आहे .

खरेतर एल.पी.जी मुळे आरक्षण शून्य झाले आहे . आणि आपले बांधव आरक्षणासाठी भांडत आहेत . म्हणून ओबीसी , एससी , एसटी व यातून धर्मपरिवर्तीत बांधव आणि महिलांनी आपापसात भांडत बसण्यापेक्षा राष्ट्रव्यापी जनआंदोलन निर्माण करायला पाहिजे .

उत्तर भारतात चमार विरुद्ध वाल्मिकी , राजस्थानात मीना विरुद्ध गुर्जर , दक्षिण भारतात माला विरुद्ध मादिगा तर महाराष्ट्रात सुरुवातीला महार विरुद्ध मातंग , महार विरुद्ध चांभार आणि आता मराठा – कुणबी विरुद्ध माळी आणि मराठा कुणबी विरुद्ध धनगर अशी ही भांडणे लावली जात आहेत .

यासाठी ओबीसी / एससी / एसटी यांच्यातील शिकल्या सवरलेल्या लोकांचा,लेखकांचा व विचारवंतांचा ही वापर केला जात आहे .

वापराचा एक सिद्धांत आहे . कोणता ?

ज्यांचा वापर होतो त्यांचे कधीच कल्याण होत नाही . म्हणून ओबीसी / एससी / एसटी व यातून धर्मपरिवर्तीत आणि महिलांनी एकत्र येऊन हे दुसरे स्वातंत्र्याचे आंदोलन निर्माण करायला हवे तरच शिव-फुले-शाहू-पेरियार-आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण होऊ शकेल .

दीपक इंगले बंधु यांच्या साभार…..

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *