July 5, 2020

आज ११ जून १९६३ रोजी थिच क्वांग डक या बौद्ध भिक्षु ने स्वतःला जिवंत जाळून का घेतले होते तुम्हाला महिती आहे का

हि घटना आहे व्हियतनाम या देशातील ११ जून १९६३ ला बौद्ध भिखू थिच क्वांग डक यांनी स्वतःला जाळून घेत बौद्ध धम्माच्या रक्षणा करिता संपूर्ण जगाचे लक्ष वियतनाम कडे वेधले होते. वरती तुम्हाला जो फोटो दिसत आहे त्या मध्ये भन्ते थिच क्वांग डक आहेत आणि जेंव्हा त्यांनी स्वतःला जाळून घेतला होत तेंव्हा त्याचं वय ६६ वर्षे होतं आणि त्यांना भिखू बनून फक्त ६ वर्षे झाले होते.

११ जून रोजी भंते थिच क्वांग डक यांनी वियतनाम देशातील सायगाव या शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वतःला जाळून घेत प्राण त्यागले होते . भंते ज्या प्रमाणे ध्यान मुद्रेत बसलेले असतात त्याच प्रमाणे भंते थिच क्वांग डक बसलेले होते आणि विशेष म्हणजे जेंव्हा ते जळत होते तेंव्हा ते जरा देखील हालले नाही किंव्हा त्यांनी हाल चाल देखील केली नाही किंव्हा वेदना होत आहेत म्हणून आरडाओरडा देखील केला नाही आणि त्यांचा हा फोटो मैल्कन ब्रावून यांनी काढला होता.

भंते थिच क्वांग डकयांनी हा निर्णय का घेतला होता 

१९६३ ला वियतनाम मध्ये जी सरकार होती ती बौद्ध धर्मियांना दुय्यम स्थाराची वागणूक देत असे आणि विशेष म्हणजे त्यावेळी वियतनाम ७० टक्के लॉक संख्या हि बौद्ध धाम्मियांची होती तरी देखील वियतनाम मधील सरकार कैथोलिक चर्च आणि ईसाई समाजाला  प्राथमिकता देत असे आणि बौद्ध समाजावर अन्याय करत असे. आणि ज्या दिवशी हि घटना घडली होती त्या दिवशी तर अस म्हणतात सरकार ने एक नवीन नियम लागू केला होता बौद्ध भंते हे बौद्ध धर्मीय झेंडा फडकवू शकत नव्हते आणि काही दिवसातच बुद्ध जयंती देखील येणार होती आणि हनिर्न्य घेण्यात आला होता.

सरकार ने घेतलेल्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी अनेक आंदोलन करण्यात आली पण त्या आंदोलकांवर सरकार ने गोळीबार केला होता आंनी त्यामध्ये जवळपास 9 लोकांचा प्राण गेला होता आणि या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी त्या भंते नी हा निर्णय घेतला होता

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *