August 6, 2020

उच्चवर्णीयांना कंटाळून बनली कुख्ख्यात डाकू, मग बौद्ध धम्मात धर्मांतर, त्यानंतर खासदार, त्यानंतर तिची गोळ्या घालून हत्या! जाणून घ्या राणी ‘फुलन देवी’ची गोष्ट

राणी फुलनदेवीचा स्मृतिदिन. एक हिंसावादी डाकू’राणी फुलन देवी शेवटी बौद्ध धम्माच्या वाटेवर आली हि काळाला धडक देणारी आणि हिंदू धर्मातील जातपात या प्रथेला लाजवणारी गोष्ट आहे. या ऐतिहासिक घटनेवर प्रकाशझोत टाकणारा जयभिम टुडे चा छोटासा प्रयत्न.

कोण होती फुलन देवी ?
फुलन देवी हि मुलगी १० ऑगस्ट १९६३ ला उत्तरप्रदेशमधील गोरहा येथील पूर्वा मध्ये एका खालच्या जातीत जन्माला आली.
वसंतोत्सवाच्या दिवशी जन्म झाला म्हणून तिचं नाव ‘फुलन’ ठेवण्यात आलं. तिचे वडील खूपच गरीब आणि दुर्बल होते, तर आई स्वभावानं कडक आणि रुबाबदार होती.
फुलन तिच्या आईवरच गेली होती. ती कोणालाही घाबरत नसे. फुलनला तीन बहिणी आणि एक भाऊ अशी चार भावंडं होती. फुलन दुसऱ्या नंबरची.
मोठ्या बहिणीनंतर वयाच्या ११ व्या वर्षीच फुलनचं लग्न तिच्या वडिलांच्या वयाच्या इसमासोबत झालं. त्याने फुलन चा यौनशोषण व छळ केल्याने ती तिथून आपल्या घरी पळून आली.
‘नवरा सोडून आलेली रां**’ म्हणून तिला हिनवू लागले. गावकऱ्यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली.
तिला गावातून हाकलून लावा असं म्हणू लागले. कारण नवरा नसलेली बाई गावात राहणं ही त्यांच्या दृष्टीनं चांगली गोष्ट नव्हती. गावातील सरपंच, पाटील आणि उच्चवर्णीय ठाकूर तिला धमकावू लागले.

“अल्पवयातच फुलन वर बलात्कार”
वयाच्या १५ व्या वर्षी तिच्यावर बलात्कार झाला, तोसुद्धा तिच्या आई-वडिलांसमोर. बलात्कार करणारा उचचवर्णीय सरपंचाचा मुलगा होता. फुलननं पोलिसांकडे मदत मागितली, पण पोलिसांनी तिला काही मदत केली नाही. काही दिवसांनंतर फुलन तीच्या बहिणीच्या गावी गेली,तेव्हा इकडे सरपंच आणि इतर उचचवर्णीय तिच्यावर डाकू असण्याचा खोटा आरोप लावून तिला व तिच्या बापाला पोलिस ठाण्यात टाकतात,तिथं काही पोलीस अधिकारी तिच्यावर बलात्कार करतात. तिच्यावर अनेक अत्याचार करतात आणि तिला धमकीही देतात की, ‘कोणाला सांगू नकोस. अन्यथा आम्ही तुझ्या xxx मध्ये चटणी/मिरची टाकू…’
या भीतीमुळे ती गुन्हा कबूल करते आणि काही महिने जेलमध्ये राहते. नंतर तिची आई कर्ज काढून तिचा जामीन घेते.जेलमधून सुटल्यावरही सरपंच व इतर लोक तिला त्रास देऊ लागतात. तिला ठार करण्यासाठी बाबू गुज्जर या डाकूला तिची सुपारी देतात.

“साधारण मुलगी अन्यायाला कंटाळून डाकू बनते”

सुपारी दिलेला बाबू गुज्जर फुलनदेवीवर बलात्कार करतो. हे बघून त्याच्याच गँगमधला एक डाकू (विक्रम मल्लाह) बाबू गुज्जरला ठार करतो व फुलनला वाचवतो. कारण तो फुलनच्याच जातीचा असतो. पुढे तो फुलनशी लग्न करतो आणि तिला आपल्या गँगमध्ये सामिल करून घेतो.येथूनच फुलन डाकू बनते. त्यांची गँग अनेक गावांमध्ये जाऊन धाडी टाकते. श्रीमंतांना लुटून गरिबांना काही पैसे देते. तिला लोक रॉबिनहूडसुद्धा म्हणत.एक काळ उत्तर भारतात प्रचंड खुना खुनी करणाऱ्या फुलनदेवीचा प्रचंड दरारा होता. तिची दरोडेखोरांची टोळी दिवसा ढवळ्याही दरोडे घालत असे. सामुहिक हत्याकांडे घडवित असे. ज्या उच्चवर्णीय ठाकुरांनी तिच्यावर अत्याचार केले होते त्यांनादेखील एका लाईन मध्ये उभा करुन सिनेमाच्या सीनलासुद्धा लाजवेल याप्रमाणे गोळ्या घालून हत्या करते.फुलनवर सरकार एक लाखाचं बक्षीस जाहीर करतं. पण फुलन कोणाच्याच हाती येत नाही,तिची दहशत संपवण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले. शेवटी तीच पोलिसांना शरण आली,तिला तिहारच्या तुरुंगात डांबण्यात आले. इंदिरा गांधीच्या सरकारने १९८३ मध्ये एक समझोता केला की फुलन देवीला मृत्युदंड देणार नाही आणि तिच्या कुटूंबातील कोणालाही काही त्रास होणार नाही,तिच्या १० हजारपेक्षा जास्त समर्थकांनी तिची साथ सोडली नाही,पुढे खटला न चालवता ११ वर्षे कारावास भोगून १९९४ मध्ये मुलायमसिंगचे सरकार आल्यानंतर तीचा तुरुंगवास संपला.

“बौद्ध धम्मात धर्मांतर व राजकारण”

बरेच दलित लोक फुलन देवीचे कट्टर समर्थक होते.
तुरुंगातून बाहेर पडताच तिने ८ मार्च या तारखेला जागतिक महिला दिनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि शांततेचा मार्ग स्वीकारला, पुढे तिने लोकसभेची निवडणूक लढवून आणि जिंकून संसदेत प्रवेश केला,परंतू दिल्ली येथे २५ जुलै २००१ या दिवशी तिची बंदुकिने गोळ्या घालून संशयास्पद हत्या करण्यात आली,पुढे फुलन देवीवर चित्रपटही बनला. चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांनी “बॅंडिट क्वीन’, हा चित्रपट फुलन देवीचा जीवनपट उलगडणारी सत्यकथा पडद्यावर आणली,डाकू राणी फुलनदेवी हिच्या सत्य जीवनावर आधारित “इंडियाज बॅंडिट क्वीन’, ही कादंबरी जगभर प्रचंड गाजली,ग्रामीण भागातली लाजरी बुजरी मुलगी फुलनदेवी ही पुढच्या जीवनात इतकी क्रूर झाली यामागचे कारण बहुतेक तिचा झालेला बाल विवाह, तिच्यावर दरोडेखोरांच्या टोळीने केलेले अत्याचार यामुळे असावे.

फुलनदेवी च्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

( माहिती इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी एक शेअर नक्की करा आणि ज्यांनी पेज ला लाईक केलेलं नसेल त्यांनी पेज एक लाईक नक्की करा)

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *