July 5, 2020

१९५७ ते १९६७ पर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला विरोधी पक्ष होता.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हंटल कि डोळ्या समोर येत ते फुटीच राजकारण आणि विखुरलेले नेते पण मित्रानो तुम्हाला हे माहिती आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एक काळचा दुसरा नंबर चा पक्ष होता कदाचित नाही त्यामुळे आजचा हा लेख नक्की वाचा आणि मग तुम्हाला समजेल काय पवार होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची आणि आज काय झाल आहे तर नक्की वाचा.

संस्थापक:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर

स्थापना:- ३० सप्टेंबर १९५६(दिल्ली) जाहिर घोषणा:- ३० ऑक्टोबर १९५७ (नागपूर)

– १९५७ च्या निवडणुकीत निवडून आलेले पक्षाचे लोक प्रतिनिधी

लोकसभा :- १२ खासदार
विधानसभा:- एकूण २९ आमदार
महाराष्ट्र (१६), पंजाब (५), मद्रास (३), कर्नाटक (२), आंध्रप्रदेश (१), गुजरात (१),
या आमदाराच्या सहकार्याने १९५८ ला बॅ.खोब्रागडे राज्यसभेत निवडून आले.
पक्षाला मिळालेली एकूण मते २१ लाख ७३ हजार.

१९६२ च्या निवडणुकीत निवडून आलेले पक्षाचे लोक प्रतिनिधी

लोकसभा :- एकूण ३ खासदार
विधानसभा:- एकूण २० आमदार उत्तरप्रदेश(१०), महाराष्ट्र(३), पंजाब(५) मध्यप्रदेश(१), आंध्रप्रदेश (१),
पक्षाला मिळालेली एकूण मते ३२ लाख २१ हजार.

१९६७ च्या निवडणुकीत निवडून आलेले पक्षा चे लोक प्रतिनिधी
लोकसभा :- एकूण १ खासदार
विधानसभा:- एकूण २२ आमदार हरियाणा (२), महाराष्ट्र(५), पंजाब(३) कर्नाटक (१), आंध्रप्रदेश(२),बिहार(१), उत्तरप्रदेश (८),
पक्षाला मिळालेली एकूण मते ३६ लाख ७६ हजार.

अशाप्रकारे डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष १९५७ ते १९६७ पर्यंत भारतात दुसऱ्या क्रमांकावर होता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” बरखास्त करून “भारतीय रिपब्लिकन पक्ष” स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती, परंतु पक्ष स्थापन करण्यापूर्वीच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.

खरंच हे पाहिल्यावर समजते आपल्या पक्ष्याला एक सुवर्ण काल देखील लाभला आहे पण काही कारण मुले नंतर पक्ष्यात फाटाफूट झाली आणि पक्ष विखुरला गेला आणि आज त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आणि कदाचित त्यामुळे आज परत सार्वजन म्हणत आहे रिपब्लिकन ऐक्य हव.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *